भारती सिंह

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

भारती सिंह

भारती सिंह (जन्म: ३ जुलै १९८४) ह्या एक दूरचित्रवाहिनी तसेच भारतीय चित्रपट सृष्टीतील विनोदी कलाकार आहेत. सिंह यांनी असंख्य 'हास्यप्रधान लघुमालिका (कॉमेडी स्केच शो)' तयार केल्या आहेत. तसेच विविध 'पुरस्कार वितरण कार्यक्रमांचे' सूत्रसंचालन देखील केले आहे.

त्यांनी 'झलक दिखला जा' (२०१२), 'नच बलिये-८' (२०१७) आणि 'फियर फॅक्टर:खतरों के खिलाडी-९' (२०१९) या 'वास्तव प्रदर्शनी (रिअ‍ॅलिटी शो)' मध्ये भाग घेतला होता. 'कलर्स टिव्ही' वरील 'खतरा खतरा खतरा' या कार्यक्रमातील भारतीचा सहभाग प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. या कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती भारतीचेचे पती हर्ष लिंबाचिया यांची होती. इ.स. २०१६ मधील 'फोर्ब्स इंडिया'च्या 'प्रसिद्ध १०० भारतीय व्यक्तिमत्त्वे' (टॉप १००-सेलिब्रिटी)च्या यादीत प्रथमच भारतीचा समावेश झाला. त्यानंतर सलग २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये भारतीचे नाव या यादीत कायम राहिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →