कॉमेडी सर्कस शो हा एक भारतीय दूरचित्रवाणी कार्यक्रम आहे, जो सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित झाला होता. या कार्यक्रमाचे एकूण १८ हंगाम तयार करण्यात आले होते. १६ जून २००७ रोजी याचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अनेक भागांत दूरचित्रवाणी सेलिब्रिटींच्या जोड्या या स्टँड-अप विनोद आणि स्किट्स सादर करताना दिसतात. तसेच पंचांकडून गुण घेत प्रतिष्ठित विजेतेपद जिंकण्यासाठी विविध जोड्या एकमेकांशी स्पर्धा करतात.
या कार्यक्रमाने सध्या लोकप्रिय असलेल्या अनेक भारतीय विनोदकारांची कारकीर्द सुरू केली. यामध्ये कपिल शर्मा, भारती सिंह, कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी इत्यादींचा समावेश आहे.
कॉमेडी सर्कस
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.