क्यूंकी सास भी कभी बहू थी ही एक भारतीय दूरचित्रवाणी मालिका आहे, जी ४ जुलै २००० ते ७ नोव्हेंबर २००८ या कालावधीत स्टार प्लसवर प्रसारित झाली होती. शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी त्यांच्या बालाजी टेलिफिल्म्सच्या बॅनरखाली या शोची सहनिर्मिती केली होती.
हा कार्यक्रम एका आदर्श सूनभोवती केंद्रीत होता. ती एका पंडिताची मुलगी असते जी गोवर्धन विराणी या श्रीमंत उद्योगपतीच्या नातवाशी लग्न करते. या सूनेची म्हणजे तुलसी विराणीची भूमिका स्मृती इराणी यांनी केली होती.
हा कार्यक्रम इ.स.२००० च्या दशकातील भारतीय टेलिव्हिजनवर सर्वात जास्त काळ चाललेला दैनिक कार्यक्रम आहे. ही मालिका २००० ते २००८ पर्यंत चालली आणि १,८३३ भाग पूर्ण केले. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात १००० भाग पार करणारी ही पहिली मालिका होती. तसेच या मालिकेने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील प्रवेश केला.
क्यूंकी सास भी कभी बहू थी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.