दिव्या भारती

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

दिव्या भारती

दिव्या भारती (२५ फेब्रुवारी, १९७४ - ५ एप्रिल, १९९३) ही एक भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री होती जिने प्रामुख्याने हिंदी आणि तेलुगु चित्रपटांमध्ये काम केले. ती तिचा अभिनय, अष्टपैलु व्यक्तिमत्त्व आणि सौंदर्यासाठी ओळखली जाणारी तसेच त्याकाळातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी भारतीय अभिनेत्री होती.

भारतीने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात किशोरवयात केली होती. तेव्हा ती पिन-अप मॉडेलिंग असाइनमेंट करत होती. तिने सर्वप्रथम तेलुगू भाषेतील साहसी प्रणयपट 'बॉबिली राजा' (१९९०) मध्ये वेंकटेश सोबत मुख्य भूमिकेतून भारतीय चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या अयशस्वी ठरलेल्या तामिळ भाषेतील 'निला पेन्ने' (१९९०) चित्रपटात तिने दुसरी भूमिका केली. 'ना इलेना स्वर्गम' (१९९१) आणि 'असेंब्ली राउडी' (१९९१) या दोन तेलुगू चित्रपटांमध्ये तिने छोट्या भूमिका केल्या होत्या. भारतीला तिचे पहिले व्यावसायिक यश तेलुगू विनोदी प्रणयपट 'राउडी अल्लुडू' (१९९१) मध्ये मिळाले.

तेलुगू चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, तिने १९९२ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि हिंदी साहसपट 'विश्वात्मा' (१९९२) द्वारे तिच्या बॉलीवूड मधील अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. १९९२ मध्ये आलेला हिंदी चित्रपट 'शोला और शबनम' हा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि तिच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरला. तिने 'दीवाना' या प्रणयपटात भूमिका करून स्वतःला सिद्ध केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला.

दिव्या भारतीचा ५ एप्रिल १९९३ रोजी, वयाच्या १९ व्या वर्षी, मुंबईतील तिच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. तिच्या गूढ मृत्यूमागे अनेक कटकल्पना आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →