१९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार पवन शाह हा आहे. प्रशिक्षक पदावर माजी भारतीय खेळाडू राहूल द्रवीड हे आहेत.
१९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने आज पर्यंत ४ वेळा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. सन २००० मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली, २००८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, २०१२ मध्ये उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली तर २०१८ मध्ये पृथ्वी शॉ हा कर्णधार असताना भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. याशिवाय १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने खेळलेल्या एकदिवसीय सामन्यांतील ७७% सामने जिंकले आहेत. ही सरासरी इतर कोणत्याही १९ वर्षांखालील क्रिकेट संघापेक्षा जास्त आहे.
भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.