केनेट्टगी ब्रह्मानंदम तथा ब्रह्मानंदम हे एक भारतीय अभिनेते, विनोदी कलाकार आणि दिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९५६ रोजी आंध्र प्रदेशमधील एका गावात झाला. त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात तेलुगू सिनेमामधून केली. त्यांनी जगात सर्वाधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांनी आत्तापर्यंत १००० हून जास्त चित्रपटामध्ये काम केल्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांच्या नावावर विक्रम आहे. त्यांनी हा जागतिक विक्रम स्थापित केला आहे. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना २००९ साली पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले..
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्रह्मानंदम
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.