बेसाल्ट (कॉलोराडो)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बेसाल्ट (कॉलोराडो)

बेसाल्ट हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर ईगल आणि पिटकिन काउंट्यांमध्ये आहे. २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ३,९८४ होती. यांतील २,९१७ व्यक्ती ईगल काउंटीमध्ये तर १,०६७ व्यक्ती पिटकिन काउंटीमध्ये राहत होत्या. बेसाल्ट हा एडवर्ड्स-ग्लेनवुड स्प्रिंग्स नगरक्षेत्राचा भाग आहे.

या शहराला जवळ असलेल्या बेसाल्ट खडकांच्या डोंगराचे नाव दिलेले आहे. या शहराची स्थापना रेल्वे स्थानक म्हणून झाली आणि १९०१ मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली.

बेसाल्ट राज्य महामार्ग ८२ वर फ्राईंगपॅन आणि रोअरिंग फोर्क नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →