बूढानीलकंठ मंदिर हे नेपाळ देशातील काठमांडू जिल्ह्यातील शिवपुरी टेकडीच्या प्रदेशात असलेले हिंदू धर्मातील विष्णू या देवतेचे मंदिर आहे. शिवपुरी टेकडी प्रदेश हा काठमांडू खोऱ्याच्या उत्तरेला आहे. या देवस्थानामुळे आजूबाजूच्या परिसराला देखील बूढानीलकंठ असे म्हणले जाते.
या मंदिरात भगवान महाविष्णूची शेषशायी म्हणजे शेषनागावर निद्रिस्त भलीमोठी आडवी मुर्ती आहे. या मंदिरातील बूढानीलकंठाची मूर्ती ही नेपाळमधील सर्वात मोठी दगडी कोरीव काम मानली जाते. या देवतेस स्थानिक नेपाळी लोक 'भुइज:सि नारायण' असे देखील म्हणतात.
बूढानीलकंठ मंदिर
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.