चांगुनारायण मंदिर हे नेपाळ मधील भक्तपुर जिल्ह्यातील चांगुनारायण गावात वसलेले प्राचीन हिंदू मंदिर आहे. हे मंदिर एका उंच टेकडीवर वसलेले आहे, ज्याला चांगू किंवा डोलागिरी असेही म्हणतात. या मंदिराच्या भोवती चंपक वृक्षाचे जंगल आहे. ही टेकडी काठमांडूच्या पूर्वेस ७ मैल म्हणजेच अंदाजे १२ किमी अंतरावर आणि भक्तपूरच्या उत्तरेस काही मैलांवर आहे. डोंगराच्या शेजारी मनोहरा नदी वाहते. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित असून ऐतिहासिक, कलात्मक आणि धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणूनही महत्त्वाचे आहे. तसेच हे मंदिर नेपाळच्या इतिहासातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचा इ.स. १९७९ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. तसेच हे युनेस्कोच्या नेपाळ मधील जागतिक वारसा असलेलया काठमांडू व्हॅलीच्या सात स्मारकांपैकी एक आहे.
तेलकोट भांज्यांग-तेलकोट दांडा-चांगू हा मार्ग खोऱ्यातील ट्रेकिंगचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. हे क्षेत्र नगरकोटच्या ट्रेकिंगसाठी आणि काठमांडू व्हॅलीच्या दृश्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. काश्मिरी राजाने आपली मुलगी चंपक हिचा विवाह भक्तपूरच्या राजपुत्राशी केला. चांगू नारायण मंदिर हे तिच्या नावावर आहे.
चांगुनारायण मंदिर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.