कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्यशैलीचे दगडी मंदिर आहे.
हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. कट्यार काळजात घुसली (चित्रपट) या मराठी चित्रपटातील शिव भोला भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे, पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. याव्यतिरिक्त विटी-दांडू व हिरवं कुंकू या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण सुद्धा या मंदिरात झाले आहे.
कोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.