कंबोडिया (अधिकृत नाव: ख्मेर: ') हा आग्नेय आशियातील एक देश आहे. इसवी सनाच्या अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत बहुतांश फ्रेंच इंडोचीन द्वीपकल्पावर राज्य गाजवणाऱ्या सामर्थ्यवान हिंदू-बौद्ध ख्मेर साम्राज्याचे वारसदार राज्य म्हणजेच आजचा आधुनिक कंबोडिया म्हणता येईल. आधुनिक कंबोडियाची राजधानी पनॉम पेन येथे वसलेली आहे. या देशाच्या पश्चिमेस व वायव्येस थायलंड, ईशान्येस लाओस, पूर्वेस व आग्नेयेस व्हियेतनाम हे देश असून दक्षिणेस थायलंडचे आखात आहे.
कंबोडियामध्ये घटनात्मक राजेशाही असून शासनाच्या सर्वोच्चपदी राजा असतो, तर पंतप्रधान कार्यकारी प्रशासकीय प्रमुख असतो. थेरवादी बौद्ध धर्म हा कंबोडियाचा अधिकृत धर्म असून या देशातील ९७% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. व्हिएतनामप्रमाणेच कंबोडिया या देशातही प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. येथे साधारणता इसवीसनाच्या पाचव्या शतकापासून भारतीय संस्कृतीचे अवशेष सापडतात. कांबोडिया येथील 'अंगकोरवाट' या प्रसिद्ध मंदिरामुळे येथील भारतीय संस्कृतीचे महत्त्व विशेष जाणवते. कांबोडियात हरिहर, शिव,दुर्गा, विष्णू, गणेश, स्कंद इत्यादी हिंदू देवतांच्या मूर्ती आढळून आल्या आहेत. येथील प्राचीन मंदिराच्या आवारात मंदिर स्थापत्याचे शिलालेख सापडतात. लंडनमधील व्हिक्टोरिया अल्बर्ट वस्तूसंग्रहालयामध्ये कंबोडियातील सर्व जुन्या गणेशमूर्ती पैकी असलेली एक मूर्ती आढळते. ही मूर्ती इसवीसनाच्या सहाव्या शतकाच्या अखेरीस किंवा सुरुवातीच्या कालखंडात मधील असावी. भारतातील गुप्तकाळातील गणेशमूर्ती प्रमाणे ही अत्यंत साधी दगडी गणेशमूर्ती आहे. या मूर्तीच्या मस्तकावर मुकूट नाही. तसेच अंगावर कोणतेही दागिने दाखवलेले नाहीत. या मूर्तीच्या डाव्या हातात मोदकांनी भरलेले पात्र दाखवले असून गणपतीची सोंड त्या पात्रावर दाखवली आहे. तर या मूर्तीच्या उजव्या हातात हस्तिदंत आहे. कांबोडियात अंग्कोर पूर्व काळातील गणेशमूर्ती कमी आढळतात. त्यामुळे त्यापैकी ही एक महत्त्वाची मूर्ती आहे. येथील मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या संग्रहालयात कंबोडियातील इसवीसनाच्या सातव्या शतकातील उभी दगडी गणेशमूर्ती आहे. या मूर्तीला दोनच हात दाखवलेले असून अंगावर कोणताही दागिना नाही. तसेच या गणेशाने कांबोडियातील पारंपरिक कटिवस्त्र नेसलेली दाखवलेले आहेत. एकूणच भारत आणि कंबोडिया या दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक समन्वय झाल्याचे दिसून येते.
कंबोडिया
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.