हरिहरालय हे प्राचीन ख्मेर साम्राज्याच्या राजधानीचे शहर होते. सध्याचे कंबोडिया हे प्राचीन कंबोज या नावाने ओळखले जात असे. कंबोडियातील सिएम रीप शहराच्या जवळ, अंगकोर थोम परिसराच्या जवळच हे ठिकाण असून रोलुओस या नावाने आता हे ठिकाण ओळखले जाते. अंगकोर थोम ही प्राचीन ख्मेर साम्राज्याची शेवटची राजधानी होती असे मानले जाते. येथे प्राचीन ख्मेर राजवटीचे अवशेष आहेत. इसवी सनाच्या नवव्या शतकातील कंबोडियातील अंगकोर साम्राज्य आणि ख्मेर राजवटीचा सुवर्णकाळ व हिंदू संस्कृतीचा प्रभाव या ठिकाणी अवशेषांच्या रूपांत पहायला मिळतो. या राजधानीची उपराजधानी म्हणून अमरेंद्रपूर नावाची उपराजधानी जयवर्मन राजाने वसविली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हरिहरालय
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.