पशुपतिनाथ मंदिर हे एक नेपाळ देशातील काठमांडू मधील बागमती नदीच्या काठावर वसलेले शिव मंदिर आहे. या मंदिर संकुलाचा इ.स. १९७९ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. तसेच हे युनेस्कोच्या नेपाळ मधील जागतिक वारसा असलेलया काठमांडू व्हॅलीच्या सात स्मारकांपैकी एक आहे.
हे मंदिर जांबूद्वीप क्षेत्रावरील तामिळ पादल पेट्र स्थलम (महादेवाचे पवित्र शिवलिंग) मधील २७५ लिंगापैकी एक आहे. शिव पुराणातील कोटिरुद्र संहितेच्या अकराव्या अध्यायात याचा उल्लेख 'उत्तरे कडील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचे शिवलिंग असून सर्व इच्छांचा दाता' असा आहे. धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनण्यापूर्वी नेपाळ हे एक हिंदू राष्ट्र होते. त्याकाळी पशुपति ही नेपाळची राष्ट्रीय देवता तथा आराध्य दैवत होते.
पशुपतिनाथ मंदिर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.