बिष्णुपूर हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील बिष्णुपूर परिसरात स्थित असून येथील सहा विधानसभा मतदारसंघ बांकुरा जिल्ह्यामध्ये तर उर्वरित एक पूर्व बर्धमान जिल्ह्यात आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित आहे.
१९७१ ते २०१४ दरम्यान तब्बल ४३ वर्षे येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ह्या डाव्या पक्षाचे संपूर्ण वर्चस्व होते. माकपचे अजित कुमार साहा, सुखेंदू खान, संध्या बौडी, सुश्मिता बौडी इत्यादी उमेदवार येथून सलग ११ वेळा निवडून आले होते.
बिष्णुपूर लोकसभा मतदारसंघ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.