बाटी हा भारत देशाचे राजस्थान राज्यातील वाळवंटी प्रदेशातील खाद्य पदार्थ आहे. तो गव्हाच्या पिठाचे गोळे करून निखाऱ्यावर भाजून बनविला जातो. तो मध्य प्रदेशातील खारगाव, पूर्व उत्तर प्रदेश विभागातील वाराणसी आणि पश्चिम बिहार मध्येही बनविला जातो.
बाटीचा आकार गोल, त्रिकोणी, गोळा स्वरूपात असतो आणि त्यात कांदा, लसूण, सातू यांचे मिश्रण समाविष्ट करतात. बाफळा हा एक बाटीचाच प्रकार आहे मात्र तो नरम असतो. हे पदार्थ साजूक तूप, गरम डाळ तडका व चटणी बरोबर खातात. दाल बाटी बरोबर कुरमा दिला जातो. हा बीट मिक्सरवर किंवा खिसणीवर बारीक करून त्यात साजूक तूप, साखर घालून बनवितात.
बाटी
यामागील विज्ञान आणि इतिहास.