तूप हे लोणी कढवून बनविले जाणारे एक पाकमाध्यम आहे. त्याचा उपयोग पाककलेत तसेच धार्मिक क्रियांमध्ये केला जातो.
तूप हे दुधापासून तयार होत असल्यामुळे दुधामधील अ, ड, ई, क ही जीवनसत्त्वे स्निग्ध पदार्थात विरघळणारी असल्यामुळे ती आपोआपच तुपात येतात. म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा स्निग्ध पदार्थ जास्त असतात त्यामुळे त्या दुधाचे लोणी कढवल्यावर जास्त तूप मिळते.
दुधापासून तयार होणाऱ्या लोण्यात सुमारे ८० ते ८२ टक्के स्निग्ध पदार्थ,१६ ते १७ टक्के पाणी व २ टक्के घन पदार्थ असतात.
घी (संस्कृत : घृतम्), हे भारतीय उपमहाद्वीपामध्ये प्राचीन काळापासून भोजनाचा एक घटक आहे. भारतीय भोजनात खाद्य तेलाच्या जागी तूप वापरले जाते.. तूप हे दुधापासून मिळालेल्या लोण्यापासून बनवले जाते. दक्षिण आशियातील आणि मध्य पूर्व भागातील लोकांच्या आहारात तूप हा एक महत्त्वाचा घटक आहे.
तूप
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?