दूध

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

दूध

दूध एक अपारदर्शक पांढरा द्रव आहे जो सस्तन प्राण्याच्या मादीच्या स्तनांतून स्त्रवणारा एक पांढरा द्रव पदार्थ आहे. नवजात अर्भकासाठी दूध हे पोषक अन्न आहे.नवजात दूध इतर पदार्थांचे सेवन करण्यास अक्षम होईपर्यंत ते दुधावर अवलंबून असते. साधारणत: दुधात ७४ टक्के पाणी असते आणि उर्वरित भागात घन घटक असतात म्हणजेच खनिजे आणि चरबी असतात. गाय व म्हशी व्यतिरिक्त विविध कंपन्यांचे पॅकेज्ड दूधही बाजारात उपलब्ध आहे. दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि राइबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी -२) तत्त्व असते , त्याशिवाय फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन आणि जीवनसत्त्वे अ, डी, के आणि ई यासह अनेक खनिजे आणि चरबी आणि ऊर्जा असते. याव्यतिरिक्त, त्यात बरीच सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य आणि काही जिवंत रक्तपेशी असू शकतात.

दूध हे आपल्या आहाराचा मुख्य घटक आहे. पूर्वीच्या काळापासून भारतीय संस्कृतीत दुधाला महत्त्व दिले जाते. दूध व दुधाचे पदार्थ हे सर्व पूजा-अर्चाना, नैवेद्य यात वापरले जातात. आहारशास्त्रात दूध व दुधाच्या पदार्थाना ‘संपूर्ण आहार’ असे म्हणतात. याचे कारण असे की, नवजात शिशू आपल्या आयुष्याचे पहिले सहा महिने फक्त दुधावरच अवलंबून असतो. दूध व दुधाचे पदार्थ शाकाहारी अन्नातील मुख्य घटक आहेत. दुधात प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. यातील प्रथिने डाळी, कडधान्ये यांच्यातील प्रथिनांपेक्षा उच्च दर्जाची असतात. शाकाहारी अन्नात प्रथिनांचे प्रमाण फार कमी असते. त्यामुळे दूध व त्याचे पदार्थ ही उणीव भरून काढतात. दुधातील प्रथिने उच्च दर्जाची असल्यामुळे शरीराची वाढ, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर दुधात कॅल्शियम व डी जीवनसत्त्व असते. दुधामधील कॅल्शियमचा आपल्या हाडांना खूप फायदा होतो. दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर-कर्बोदके असतात. या साखरेमुळे दुधाला गोडी येते. साखर न घालता दूध घेतले तरीही त्याला एक नैसर्गिक गोडवा असतो. हा गोडवा लॅक्टोजमुळे येत आहे

दुधामधील केसीनरेणूबरोबर कॅल्शियम फॉस्फेटचे रेणू बद्ध असल्याने केसीनच्या अन्ननलिकेतील पचनाबरोबर कॅल्शियम फॉस्फेटचेसुद्धा शोषण होते. दूध हा आपल्या आहारातील महत्त्वाचा कॅल्शियमचा स्रोत झाला आहे. दुधामधील प्रथिने आणि मेदाम्लामुळे लहान मुलांचे पोषण होते. लॅक्टोज या दुधातील शर्करेचे काहीं बालकामध्ये विकराच्या अभावामुळे पचन होत नाही. अशा बालकाना दुधाऐवजी सोयाबीनपासून बनवलेले ‘दूध’ दिले जाते. दूध हे पूर्ण अन्न आहे सुद्धा समजूत पूर्णपणे खरी नाही. दुधामध्ये लोह नसते. त्यामुळे केवळ दुधावर अवलंबून असलेल्या बालकामध्ये लोहाची कमतरता आढळते. दूध हे पूर्ण म्हणून त्याचा आहारात नियमितपणे वापर केला जातो लहान मुलांसाठी तर दूध हे पूर्णान्न आहे.



जगभरामधे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर एक अन्नपदार्थ म्हणून केला जातो. मनुष्यप्राणी फार पूर्वीपासून दुधाचे सेवन करत आला आहे. त्यासाठी खास दूध देणारे प्राणी पाळण्यात येतात. दुग्धोत्पादनासाठी प्रामुख्याने गायी पाळण्यात येतात. त्या खालोखाल शेळी, मेंढी, म्हैस या प्राण्यापासून दूध मिळवले जाते. दुग्धोत्पादनासाठी भौगोलिकतेप्रमाणे उपलब्ध प्राणी जसे उंट, याक, मूस आदींचाही वापर केला जातो. कमी अधिक प्रमाणात घोडा, गाढव, रेनडियर, झेब्रा या प्राण्यांपासून दुग्धोत्पादन होते. दुधापासून ताक,दही, लोणी, चीझ, साय (क्रीम) ,आईसक्रीम इत्यादी अनेक पदार्थ तयार केले जातात. या विविध खाद्यपदार्थांचा आहारात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →