पुरणपोळी

या विषयावर तज्ञ बना.

पुरणपोळी

पुरणपोळी (मराठी:पुरणाची पोळी ,गुजराती: પુરાણોપોલી, तमिळ: போளி पोली, कन्नड: ಹೋಳಿಗೆ ओबट्टु/होलिगे, तेलुगु:बूरेलु/बोब्बाटु/बोब्बाटलु/पोलेय्लु/भाकशालू) हा महाराष्ट्रात बनवला जाणारा एक गोड आणि महत्त्वाचा खाद्यपदार्थ आहे.

देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विविध सणांच्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.

मराठीमध्ये काही लोक पोळीसाठी चपाती हा हिंदी शब्द वापरतात. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला असू शकतो. त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पुरणपोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →