बाकू (अझरबैजानी: Bakı) ही पश्चिम आशियातील अझरबैजान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बाकू हे कॅस्पियन समुद्रकिनाऱ्यावरील तसेच कॉकासस भौगोलिक प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे. अझरबैजानचे आर्थिक, सांस्कृतिक व व्यापारी केंद्र असलेल्या बाकूची लोकसंख्या सुमारे २१ लाख आहे.
इ.स.च्या पहिल्या शतकामध्ये स्थापन झालेले बाकू शहर येथील खनिज तेलाच्या विहिरींसाठी महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. येथील ऐतिहासिक इमारतींसाठी बाकूचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत करण्यात आला आहे.
येथील हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ कॉकेशस प्रदेशामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून अझरबैजान एरलाइन्सचा प्रमुख वाहतूकतळ येथेच स्थित आहे.
बाकू
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.