अझरबैजान एरलाइन्स (अझरबैजानी: Azərbaycan Hava Yolları) ही मध्य आशियामधील अझरबैजान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. अझरबैजान एरलाइन्सचे मुख्यालय बाकू येथे असून हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तिचा प्रमुख वाहतूकतळ आहे.
अझरबैजान एरलाइन्सची स्थापना ७ एप्रिल १९९२ रोजी झाली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेली ही पहिली राष्ट्रीय विमानकंपनी होती. २००० च्या दशकात या सरकारी मालकीच्या कंपनीचे खाजगीकरण करण्यात आले. या व्यवहारात अझरबैजानी राजकीय पुढाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कंपनीची मालमत्ता गिळंकृत केली. यांत राष्ट्राध्यक्ष इलहाम अलियेव यांची मुलगी अर्झू अलियेवा ही सुद्धा होती.
अझरबैजान एरलाइन्स
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?