सिल्कएर सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड' तथा सिल्कएर ही सिंगापूरमधील एक प्रादेशिक विमान कंपनी होती. याचे मुख्य कार्यालय सिंगापूरमधील चांगी येथे होते. सिंगापूर एरलाइन्सच्या पूर्ण मालकीची उपकंपनी असलेली सिल्कएर २०१७ ते २०२१ दरम्यान सिंगापूर ते दक्षिणपूर्व आशिया, भारतीय उपखंड, पूर्व आशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलिया मधील ५४ शहरांना विमानसेवा पुरवत असे. सिंगापूर एरलाइन्सची प्रादेशिक शाखा म्हणून, तिने सिंगापूर एअरलाईन्स समूहाच्या जाळ्यातील कमी ते मध्यम अंतराच्या गंतव्यस्थानांवर सेवा दिली.
२०२१ च्या अखेरीस सिल्कएरने आपले कामकाज बंद केले आणि ते आपली मालक कंपनी सिंगापूर एरलाइन्स आणि तिची किफायती उपकंपनी स्कूट कडे हस्तांतरित केले.
सिल्कएर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?