बांगलादेश क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२५

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

बांगलादेश क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०२५

बांगलादेश पुरुष क्रिकेट संघाने मे २०२५ मध्ये संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय संघाविरुद्ध खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. हे सामने शारजा येथील शारजा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आले. मे २०२५ मध्ये, अमिराती क्रिकेट बोर्डाने (ECB) मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले. या मालिकेत सुरुवातीला फक्त दोन सामने नियोजित होते, परंतु पहिल्या सामन्यानंतर मालिकेत तिसरा सामना खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला.

संयुक्त अरब अमिरातीने मालिका २–१ ने जिंकली. संयुक्त अरब अमिरातीचा पूर्ण सदस्य संघावरचा हा दुसरा मालिका विजय होता तर बांगलादेशचा असोसिएट सदस्य संघाविरुद्धचा तिसरा मालिका पराभव होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →