बहरैन क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

बहरैन क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६

बहरैन क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६ हा मार्च २०२६ मध्ये झालेला क्रिकेट दौरा होता. बहरैन क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय टी२० आणि तीन लिस्ट-अ सामने खेळण्यासाठी मलेशियाचा दौरा केला. हा दौरा ७ ते १६ मार्च २०२६ दरम्यान झाला. सर्व सामने बायुएमास ओव्हल, पांडामारन येथे खेळवण्यात आले.

मलेशियाने पहिला टी२०आ सामना ३४ धावांनी जिंकला. बहरैनने दुसरा सामना २ धावांनी आणि तिसरा सामना ७ गडी राखून जिंकून टी२०आ मालिका २–१ ने जिंकली. विरेनदीप सिंग याला टी२०आ मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.

टी२०आ मालिकेनंतर तीन सामन्यांची लिस्ट-अ मालिका खेळवण्यात आली. बहरैनने पहिला सामना डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने १५ धावांनी, दुसरा सामना ४१ धावांनी आणि तिसरा सामना डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने जिंकून मालिका ३–० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →