बहरैन क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०२५-२६

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बहरैन क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०२५-२६

बहरैन क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०२५-२६ हा फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा होता. बहरैन क्रिकेट संघाने पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी कतारचा दौरा केला. ही मालिका १० ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान खेळवण्यात आली आणि सर्व सामने दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे झाले.

कतारने मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून दोन सामने शिल्लक असतानाच मालिका आपल्या नावे केली. बहरैनने चौथा सामना ५ गडी राखून जिंकला, तर कतारने पाचवा सामना ५१ धावांनी जिंकून मालिका ४–१ ने जिंकली.

कतारच्या झुबैर अलीने मालिकेत सर्वाधिक २०० धावा केल्या आणि तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. बहरैनकडून सोहेल अहमदने सर्वाधिक १७४ धावा केल्या. गोलंदाजीत कतारच्या शरिक मुनीरने सर्वाधिक ८ बळी घेतले, तर बहरैनकडून रिझवान बटने सर्वाधिक ५ बळी घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →