२०२५ जीसीसी महिला गल्फ चषक ही १२ ते १९ डिसेंबर २०२५ या कालावधीत ओमानमध्ये खेळवण्यात आलेली ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती. आखाती सहकार परिषदेने (जीसीसी) आयोजित केलेल्या या स्पर्धेत ओमान, बहरैन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या महिला राष्ट्रीय संघांनी भाग घेतला.
महिला गल्फ चषकाची ही पाचवी आवृत्ती होती. २०२२ मध्ये खेळवण्यात आलेली मागील आवृत्ती ही सामन्यांना टी२०आ दर्जा असलेली पहिली आवृत्ती होती.
२०२५ जीसीसी महिला गल्फ चषक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.