ओमान महिला क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०२५-२६ हा फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा होता. ओमान महिला क्रिकेट संघाने पाच महिला टी२०आ सामने खेळण्यासाठी कतारचा दौरा केला. ही मालिका ९ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान खेळवण्यात आली आणि सर्व सामने दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे झाले.
ओमानने मालिकेतील पहिले चार सामने जिंकून मालिका आपल्या नावे केली, तर कतारने पाचवा आणि शेवटचा सामना जिंकला. त्यामुळे ओमानने पाच सामन्यांची मालिका ४–१ ने जिंकली.
जयधान्या गुणसेकरने मालिकेत सर्वाधिक २०१ धावा केल्या आणि ती मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली. कतारकडून गेट्रूड चंदिरूने सर्वाधिक १६० धावा केल्या आणि मालिकेत सर्वाधिक ६ बळीही घेतले.
ओमान महिला क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०२५-२६
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.