२०२६ लोटस चषक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

२०२६ लोटस चषक ही २० ते २९ जानेवारी २०२६ दरम्यान भूतानमधील गेलेफू येथे खेळवण्यात आलेली महिला टी२० आंतरराष्ट्रीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. या स्पर्धेत भूतान, हाँग काँग आणि मलेशिया या तीन राष्ट्रीय महिला संघांनी भाग घेतला. स्पर्धेतील सर्व आठ सामने गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान येथे खेळवण्यात आले.

स्पर्धेच्या दुहेरी साखळी फेरीत प्रत्येक संघाने इतर दोन्ही संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळले. साखळी फेरीच्या अखेरीस हाँग काँगने चारही सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले, तर भूतान दुसऱ्या आणि मलेशिया तिसऱ्या स्थानावर राहिले. पात्रता सामन्यात भूतानने मलेशियाचा आठ गडी राखून पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला.

२९ जानेवारी रोजी झालेल्या अंतिम सामन्यात हाँग काँगने भूतानचा ९७ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हाँग काँगची नताशा माइल्स स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →