म्यानमार क्रिकेट संघाचा भूतान दौरा, २०२५-२६ हा डिसेंबर २०२५ मध्ये झालेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा होता. म्यानमार क्रिकेट संघाने पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी भूतानचा दौरा केला. ही मालिका २३ ते २९ डिसेंबर २०२५ दरम्यान खेळवण्यात आली आणि सर्व सामने गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, गेलेफू येथे झाले.
भूतानने मालिकेतील पाचही सामने जिंकून म्यानमारचा ५–० असा पराभव केला. मालिकेत भूतानच्या नामगे थिनलेने सर्वाधिक १९० धावा केल्या, तर सोनम येशेने सर्वाधिक १३ बळी घेतले. दुसऱ्या सामन्यात नामगे थिनलेने ४७ चेंडूत १०० धावा करून पुरुष आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये शतक करणारा भूतानचा पहिला फलंदाज होण्याचा मान मिळवला. तिसऱ्या सामन्यात सोनम येशेने ७ धावांत आठ बळी घेत पुरुष आंतरराष्ट्रीय टी२०मधील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी नोंदवली आणि एका डावात आठ बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला.
खेळाडू
म्यानमार क्रिकेट संघाचा भूतान दौरा, २०२५-२६
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?