२०२३ पुरुष आखाती टी२० आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप

या विषयावर तज्ञ बना.

२०२३ पुरुष गल्फ टी२०आ चॅम्पियनशिप ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी सप्टेंबर २०२३ मध्ये कतारमध्ये झाली. गल्फ चॅम्पियनशिपच्या उद्घाटन आवृत्तीत सहभागी संघ यजमान कतार सोबत बहरीन, कुवेत, ओमान, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे होते. सर्व सामने दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले. राऊंड-रॉबिनमधील आघाडीच्या दोन संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला.

ओमानने अंतिम फेरीत संयुक्त अरब अमिरातीचा ५ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले.

फायनलनंतर काही दिवसांनी, त्याच ठिकाणी टी-२० विश्वचषक आशिया पात्रता अ स्पर्धेचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये कुवेत, कतार आणि सौदी अरेबिया तसेच मालदीव यांचा समावेश असेल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →