२०१९ एसीसी पश्चिम क्षेत्र टी२०

या विषयातील रहस्ये उलगडा.

२०१९ एसीसी पश्चिम क्षेत्र टी२० ही २० ते २४ जानेवारी २०१९ दरम्यान ओमानमध्ये आयोजित एक ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती. बहारीन, कुवेत, मालदीव, कतार आणि सौदी अरेबिया हे पाच सहभागी संघ होते. हे सर्व सामने मस्कत येथील अल अमेरत क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले. १ जानेवारी २०१९ पासून सर्व सदस्यांना संपूर्ण ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याच्या आयसीसी च्या निर्णयानंतर, सर्व सहभागी राष्ट्रांनी स्पर्धेदरम्यान त्यांचे टी२०आ पदार्पण केले. सौदी अरेबियाने अंतिम फेरीत कतारचा - जो साखळी टप्प्यात अपराजित होता - ७ गडी राखून पराभव केला. कतारच्या तमूर सज्जादला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →