कुवेत क्रिकेट संघाचा हाँग काँग दौरा, २०२५-२६ हा फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये झालेला क्रिकेट दौरा होता. कुवेत क्रिकेट संघाने चार आंतरराष्ट्रीय टी२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी हाँग काँगचा दौरा केला. हा दौरा २५ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२६ दरम्यान झाला. सर्व सामने मिशन रोड मैदान, मॉंग कॉक येथे खेळवण्यात आले.
चार सामन्यांची टी२०आ मालिका बौहिनिया–फाल्कन चषक या नावाने खेळवण्यात आली. हाँग काँगने पहिले दोन टी२०आ सामने जिंकले, तर तिसरा सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द झाला. कुवेतने चौथा सामना जिंकला आणि हाँग काँगने मालिका २–१ ने जिंकली. मोहम्मद अस्लम याला टी२०आ मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.
टी२०आ मालिकेनंतर ३ ते ७ मार्च दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. पहिला सामना रद्द झाला. हाँग काँगने दुसरा सामना ८६ धावांनी आणि तिसरा सामना ६२ धावांनी जिंकून मालिका २–० ने जिंकली.
कुवेत क्रिकेट संघाचा हाँग काँग दौरा, २०२५-२६
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?