२०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका ही २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत बँकॉक, थायलंड येथे खेळवण्यात आलेली पुरुषांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती. क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंडने आयोजित केलेल्या या स्पर्धेत यजमान थायलंड, बहरैन, भूतान आणि जपान या चार संघांनी भाग घेतला. स्पर्धेतील सर्व आठ सामने तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक येथे खेळवण्यात आले.
साखळी फेरीत प्रत्येक संघाने इतर तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळला. जपानने तीनही सामने जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले, तर बहरैन दोन विजयांसह दुसऱ्या स्थानावर राहिला आणि दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. भूतानने तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात थायलंडचा सात धावांनी पराभव केला.
अंतिम सामन्यात जपान आणि बहरैन या दोन्ही संघांनी प्रत्येकी १०८ धावा केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतरच्या सुपर ओव्हरमध्ये बहरैनने १५/१ धावा केल्या, तर जपानला १०/२ धावांपर्यंत मर्यादित ठेवून बहरैनने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
जपानच्या अभिषेक आनंदने स्पर्धेत सर्वाधिक ९७ धावा केल्या, तर बहरैनच्या अली दाऊदने सर्वाधिक नऊ बळी घेतले.
२०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.