बशीर बद्र (उर्दू: بشیر بدر; जन्म सैयद मुहम्मद बशीर; १५ फेब्रुवारी, १९३५ – २८ मे, २०२६) हे एक भारतीय कवी होते. त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापिठात व्याख्याता म्हणून, आणि त्यानंतर १७ वर्षे मेरठ येथील मेरठ महाविद्यालयात व्याख्याता व विभागप्रमुख म्हणून काम केले. त्यांनी प्रामुख्याने उर्दू भाषेत, विशेषतः गझल प्रकारात लेखन केले. बॉलीवूड मधील गीतकार नुसरत बद्र यांचे ते वडील होते.
भारताच्या फाळणीस केंद्रस्थानी ठेवून बद्र यांनी १९७२ मध्ये शिमला करार दरम्यान 'दुश्मनी जम कर करो' नावाची एक द्विपदी लिहिली होती. बद्र यांचे मोठ्या प्रमाणातील अप्रकाशित साहित्यिक कार्य १९८७ च्या मेरठ दंगली दरम्यान नष्ट झाले. त्यानंतर ते भोपाळ, मध्य प्रदेश येथे स्थायिक झाले.
बशीर बद्र
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.