बर्लिन टेगल विमानतळ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

बर्लिन टेगल विमानतळ

बर्लिन टेगल विमानतळ (जर्मन: Flughafen Berlin-Tegel) (आहसंवि: TXL, आप्रविको: EDDT) हा जर्मनी देशाच्या बर्लिन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. भूतपूर्व पश्चिम बर्लिन भागात स्थित असलेला हा विमानतळ जर्मनीमधील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

१९व्या शतकातील प्रसिद्ध जर्मन संशोधक ऑट्टो लिलियेन्थाल ह्याचे नाव देण्यात आलेला हा विमानतळ आपल्या षटकोनी आकाराच्या इमारतीसाठी प्रसिद्ध आहे. येथे एर बर्लिन आणि युरोविंग्जची ठाणी असून लुफ्तांसाचाही मोठा तळ आहे.

बर्लिन महानगरासाठी नवीन बर्लिन ब्रांडेनबुर्ग विमानतळ बांधण्यात येत आहे. तो वापरात आल्यानंतर टेगल विमानतळ बंद केला जाईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →