बर्लिन ब्रांडेनबुर्ग विमानतळ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बर्लिन ब्रांडेनबुर्ग विमानतळ (आहसंवि: BER, आप्रविको: EDBB) (जर्मन:फ्लुगहाफेन बर्लिन ब्रांडेनबुर्ग विली ब्रांड्ट) हा जर्मनीची राजधानी बर्लिन शहराजवळचा विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वीच्या शोनेफेल्ड विमानतळास लागून आहे.

हा विमानतळ बर्लिनच्या मध्यवर्ती भागापासून १८ किमी आग्नेयेला असून येथे काँडोर, इझीजेट, युरोविंग्स, रायनएर आणि सनडेर या विमान कंपन्यांचे तळ आहेत.. येथून प्रामुख्याने युरोपीय महानगरे आणि पर्यटन स्थळांना तसेच काही आंतरखंडीय विमानसेवा उपलब्ध आहे.

हा विमानतळ टेम्पेलहोफ, शोनेफेल्ड आणि टेगेल यांच्या ऐवजी बांधलेलला आहे. टेम्पेलहोफ विमानतळ २००८ मध्ये बंद झाला आणि उर्वरित दोन २०२० मध्ये बंद झाले. त्यानंतर बर्लिन ब्रांडेनबुर्ग हा ६० लाख लोकसंख्या असलेल्या बर्लिन महानगर आणि आसपासच्या राज्यांना विमानसेवा देणारा एकमेव व्यावसायिक विमानतळ झाला. या विमानतळाने शोनेफेल्डच्या धावपट्टीसह अनेक सुविधा वापरल्या आहेत.

येथून दरवर्षी अंदाजे ३.४ कोटी प्रवासी ये-जा करतात. हा विमानतळ ड्युसेलडॉर्फ विमानतळाच्या पुढे जर्मनीतील तिसरा सर्वात व्यस्त आणि युरोपमधील २४ वा सर्वात व्यस्त विमानतळ आहे.

उद्घाटनाच्या वेळी या विमानतळाची वार्षिक क्षमता ४.६ कोटी प्रवाशांची होती. यापैकी टर्मिनल १ ची क्षमता २.८ कोटी आहे तर टर्मिनल २ ची क्षमता ६० लाख आहे आणि टर्मिनल ५ची (पूर्वीच्या बर्लिन-शोनेफेल्ड विमानतळाची इमारत) क्षमता १.२ कोटी आहे. ही क्षमता २०३५ पर्यंत ५.८ कोटी प्रवाशांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.

२००६ मध्ये बांधकाम सुरू झालेला हा विमानतळ मुळात ऑक्टोबर २०११ मध्ये उघडणार होता, परंतु गैरव्यवस्था, असंबद्ध नियोजन, ढिसाळ अंमलबजावणी, व्यवस्थापन आणि भ्रष्टाचारामुळे या प्रकल्पाला सतत विलंब होत गेला. अखेरीस मे २०२० मध्ये बर्लिन ब्रांडेनबर्ग विमानतळाला काम सुरू करण्याचा परवाना मिळाला, बांधकाम सुरू झाल्याच्या १४ वर्षांनंतर आणि अधिकृत नियोजन सुरू झाल्याच्या २९ वर्षांनंतर, ३१ ऑक्टोबर २०२० रोजी ते व्यावसायिक वाहतुकीसाठी खुले झाले. शोनेफेल्डच्या नूतनीकरण केलेल्या सुविधा २५ ऑक्टोबर २०२० रोजी 'टर्मिनल ५' म्हणून समाविष्ट करण्यात आल्या, तर इतर सर्व विमान कंपन्यांनी ८ नोव्हेंबर २०२० पर्यंत टेगेल विमानतळावरून बर्लिन ब्रांडेनबर्ग विमानतळावर स्थलांतर पूर्ण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →