बर्म्युडएर ही बर्म्युडाची ध्वजवाहक विमानवाहतूक कंपनी आहे. याचा मुख्य तळ बर्म्युडामधील सेंट जॉर्जेस येथील एल.एफ. वेड आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. बर्म्युडेरने तेथून १ सप्टेंबर २०२३ रोजी युनायटेड स्टेट्समधील शहरांना उड्डाणे सुरू केली. बर्म्युडएरला २६ जुलै २०२३ रोजी बर्म्युडा नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडून विमान चालक प्रमाणपत्र मिळाले आणि ७ ऑगस्ट २०२३ रोजी एफएएकडून मान्यता मिळाली. बर्म्युडएर ही बर्म्युडामधील पहिली स्थानिक विमान कंपनी आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये, बर्म्युडएरने अँग्विलएर या नवीन नावाखाली अँग्विला मधील क्लेटन जे. लॉइड आंतरराष्ट्रीय विमानतळाहून बाल्टिमोर, बॉस्टन आणि न्यूअर्कला हंगामी उड्डाणे सुरू केली.
बर्म्युडएर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.