बंकर हिल हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील रसेल काउंटीमधील एक छोटे गाव आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०३ होती
जे.बी. कॉर्बेट आणि व्हॅलेंटाईन हार्बाओ या ओहायोमधून येथे आलेल्या लोकांनी १८७१ च्या उन्हाळ्यात कॅन्सस पॅसिफिक रेल्वेवर बंकर हिलची स्थापना केली. येथे बटरफिल्ड ओव्हरलँड डिस्पॅच या टपाल व मालवाहतूक करणाऱ्या कंपनीच्या स्थानकाचे नाव दिले गेले. रसेल काउंटी प्रशासकांनी १८७२मध्ये बंकर हिलला काउंटीचे प्रशासकीय केन्द्र घोषित केले परंतु दोन वर्षांनंतर झालेल्या मतदानामुळी शेजारचे रसेल शहर काउंटीचे प्रशासकीय केन्द्र झाले. यासह बंकर हिलमधील मोठ्या प्रमाणातील रहिवाशांनी रसेलला स्थलांतर केले व त्यामुळे बंकर हिलची वाढ खुंटली. तरीही १८८३मध्ये येथे एक हॉटेल, पिठाची गिरणी आणि अनेक दुकाने यांसह अनेक व्यवसाय उभे राहिले होते.
बंकर हिल (कॅन्सस)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.