डोरान्स (कॅन्सस)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

डोरान्स हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्याच्या रसेल काउंटीमधील एक छोटे गाव आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १४६ होती.

सध्याच्या डोरान्सच्या ठिकाणी कॅन्सस पॅसिफिक रेल्वेने जून १८६७ मध्ये पहिल्यांदा रूळ घातले. त्यानंतर लवकरच जर्मन, इंग्लिश आणि आयरिश लोकांनी १८७०पर्यंत एक छोटी वस्ती घातली. १८७२ च्या सुरुवातीस पेनसिल्व्हेनियातून स्थलांतरित लोकही येथे रहायला लागली होती. मार्च १८७९ च्या वणव्यात येथे मोठे जळित झाले होते. त्यानंतर १८८०मध्ये डोरान्स गावाची औपचारिक स्थापना करण्यात आली. गावाला येथीलरेल्वे अधीक्षक ओलिव्हर डोरान्स यांचे नाव देण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →