रसेल (कॅन्सस)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

रसेल (कॅन्सस)

रसेल हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील रसेल काउंटीमधील सगळ्यात मोठे शहर आणि प्रशासकीय केन्द्र आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,४०१ इतकी होती.

१८६५ साली बटरफील्ड ओव्हरलँड डिस्पॅच या घोडे आणि घोडागाडीद्वारे टपाल आणि मालवाहतूक करणाऱ्या कंपनीने आत्ताच्या रसेलच्या जागेजवळ फॉसिल क्रीक नावाचे स्थानक बांधले. १८६७मध्ये कॅन्सस पॅसिफिक रेल्वेने या स्थानकाच्या उत्तरेस फॉसिल क्रीक नावाचे स्वतःचे स्थानक बांधले. त्याच वर्षी, कॅन्सस विधानमंडळाने आजूबाजूचा परिसर रसेल काउंटी म्हणून जाहीर केला केला. १८७१ साली विस्कॉन्सिनच्या रिपन येथून आलेल्या लोकांनी फॉसिल स्थानकाजवळ कायमस्वरूपी वसाहत स्थापन केली आणि त्याला काउंटीचे रसेल असे नाव दिले. १८७२मध्ये रसेल शहर हे काउंटीचे तात्पुरते प्रशासकीय केन्द्र होते.

शेजारच्या बंकर हिलशी दोन वर्षे घातलेल्या वादानंतर १८७४मध्ये रसेल कायमस्वरूपी प्रशासकीय केन्द्र झाले बनले.

१९२३ साली रसेल काउंटीमध्ये पहिली खनिज तेल विहीर रसेलच्या पश्चिमेला खोदण्यात आली. त्यानंतर १९३० च्या दशकापर्यंत खनिज तेल काढण्याच्या व्यवसायाची भरभराटझाली. आजही पेट्रोलियम उत्पादन हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग आहे.

१९९० च्या दशकाच्या मध्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढविणाऱ्या अमेरिकेच्या सेनेटर बॉब डोल आणि आर्लेन स्पेक्टर यांचे मूळ गाव म्हणून रसेलला देशभर प्रसिद्धी मिळाली. डोल यांचा जन्म रसेलमध्ये झाला आणि त्यांची कारकीर्द येथेच झाली. शेवटपर्यंत रसेल हे त्यांचे अधिकृत निवासस्थान होते.



रसेलची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीप्रधान असून गहू आणि इथेनॉल उत्पादन सुविधांवर आधारित आहे. रसेल काउंटी कॅन्ससमधील प्रमुख पेट्रोलियम उत्पादक काउंट्यांपैकी एक आहे.

इंटरस्टेट ७० आणि यूएस ४० हे महामार्ग रसेलच्या दक्षिणेला पूर्व-पश्चिम धावतात, यूएस २८१ हा महामार्ग शहरातून शहरातून उत्तर-दक्षिण जातो.

रसेल म्युनिसिपल विमानतळ यूएस ४० च्या एका समांतर मार्गाृवर शहराच्या आग्नेयेस स्थित आहे. सार्वजनिक मालकीच्या या विमानळावर एक काँक्रीट आणि एक माती/गवताची अशा दोन धावपट्ट्या आहेत. हा विमानतळ खाजगी विमानवाहतूकीसाठी वापरला जातो.

युनियन पॅसिफिक रेल्वेचा मालवाहतूक मार्ग कॅन्सस पॅसिफिक (KP) लाइन नावाने रसेल मधून पूर्व-पश्चिम असा जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →