एलिस (कॅन्सस)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

एलिस (कॅन्सस)

एलिस हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील एलिस काउंटीमध्ये असलेले छोटे शहर आहे. २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १,९५८ इतकी होती.

१८६७मध्ये कॅन्सस पॅसिफिक रेल्वेने येथील जागेवर पाणवठा बांधला व नंतर होमस्टेड कायद्यांतर्गत ही जागा खरेदी केली. तीन वर्षांनी १८७०मध्ये यूएस पोस्ट ऑफिस विभागाने येथे टपाल कार्यालय उघडले. अजून तीन वर्षांनी कॅन्सस पॅसिफिकने शहर वसवले व येथे रेल्वे स्थानक, होटेल आणि काही दुकाने उघडली. त्याच वर्षी, सिरॅक्युज आणि नंतर लुईव्हिल येथील लोक रेल्वेसाठी काम करण्यासाठी आले. या सुमारास दक्षिणेकडून काउबॉइझनी हाकत आणलेल्या गुरांच्या कळपांसाठी एलिस हे विश्रांतीचे आणि रेल्वेद्वारे रवाना करण्याचे ठिकाण होते. पुढे बुकोविना जर्मन मध्ये या भागात स्थायिक झाले.

सुरुवातीच्या काळात एलिस (तसेच जवळचे हेस) सनडाउन टाउन होते, जेथे अंधार पडल्यानंतर अश्वेत अमेरिकन लोकांना वावरण्याची मुभा नव्हती.

एलिस नगरपरिषदेत सहा सदस्य आणि एक महापौर असतात. महापौर आणि सर्व परिषद सदस्य दोन वर्षांसाठी निवडले जातात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी परिषदेची बैठक होते.

इंटरस्टेट ७० आणि यूएस ४० हे महामार्ग एलिसच्या उत्तरेकडून पूर्व-पश्चिम धावतात. कॅन्सस महामार्ग २४७ हा रस्ता शहरातून उत्तर-दक्षिण असा जातो.

युनियन पॅसिफिक रेल्वेचा एक मालवाहतूक मार्ग एलिस शहरातून पूर्व-पश्चिम जातो.

एलिस रिव्ह्यू हे स्थानिक साप्ताहिक वृत्तपत्र येथून प्रकाशित होते.

क्रायस्लर कॉर्पोरेशनचा संस्थापक वॉल्टर पी. क्रायस्लरचे लहानपण येथे गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →