गोऱ्हॅम (कॅन्सस)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

गोऱ्हॅम हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील रसेल काउंटीमधील एक छोटे गाव आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३७६ होती.

फिलाडेल्फिया आणि लँकेस्टरमधून पश्चिमेकडे निघालेल्या पेनसिल्व्हेनिया डच लोकांना विल्सन येथे जागा न मिळाल्याने ते तसेच पुढे पश्चिमेस आले व सध्याच्या गोऱ्हॅम गावाच्या ठिकाणी त्यांनी १८७२मध्ये वस्ती केली. पुढे इलिनॉयमधील एलायजा डॉज गोऱ्हॅमने १८७९ मध्ये या गावाची आखणी करून त्याला आपले नाव दिले. त्यावेळा त्याने तेथे कॅथोलिक चर्च आणि स्मशानभूमीसाठी जमीन दिली आणि किराणा दुकान, धान्य लिफ्ट, टपालकार्यालय, लाकडाची वखार आणि कोळशाच्या वखारीसह अनेक व्यवसाय सुरू केले.

१९२० च्या दशकात रसेल काउंटीमध्ये खनिज तेल सापडल्यावर गोऱ्हॅमची भरभराट सुरू झाली. टेक्साको, स्टॅनॉलिंड, आणि सोहायो या कंपन्यांनी येथे तेल काढण्याचे काम सुरू केले. त्यावेळी येथे शाळाही बांधण्यात आल्या. तेल संपल्यावर येथील आर्थिक रया गेली व आता गोऱ्हॅम मुख्यत्वे शेतीकेंद्रित गाव आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →