वाकीनी (कॅन्सस)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

वाकीनी (कॅन्सस)

वाकीनी हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील छोटे शहर आहे. ट्रेगो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार १,७९९ इतकी होती.

शिकागोमधील जमीनीवर सट्टेखोरी करणाऱ्या जेम्स कीनी आणि त्याचा भागीदार आल्बर्ट वॉरेन यांनी १८७७मध्ये येथील जमीन कॅन्सस पॅसिफिक रेल्वेकडून विकत घेतली आणि १८७९पर्यंत येथे घरे बांधून वसाहत स्थापन केली आपल्या वॉरेन, कीनी अँड कंपनीच्या नावावरून त्यांनी या वसाहतीला वाकीनी असे नाव दिले. येथे लोकांनी रहायला यावे म्हणून मोठ्या जत्रा आणि उत्सव त्यांनी आयोजित केले. सुरुवातीला ही वसाहत झपाट्याने वाढली परंतु पुढील १-२ वर्षांत पीक न आल्याने येथे रहायला आलेले लोक आले होते तितक्या लवकर तेथून निघून गेले. १८८२ पर्यंत या वसाहतीची रया गेली होती. काही वर्षांनंतर व्होल्गा जर्मन लोकांनी या भागात वस्ती केली.



वाकीनीच्या दक्षिणेकडून इंटरस्टेट ७० हा महामार्ग पूर्व-पश्चिम असा जातो. गावातून उत्तर-दक्षिण जाणारा यूएस २८३ हा महामार्ग त्याला छेदून पुढे जातो.

युनियन पॅसिफिक रेल्वेचा मालवाहतूकीचा मार्ग वाकीनीमधून पूर्व-पश्चिम जातो.

ट्रेगो वाकीनी विमानतळ आय-७० च्या दक्षिणेस यूएस २८३ च्या पश्चिम बाजूला आहे. सार्वजनिक मालकीच्या या विमातळावर एक काँक्रीट धावपट्टी असून येथून खाजगी विमानवाहतूक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →