फ्रेंच विकिपीडिया (फ्रेंच : Wikipédia en français) ही विनामूल्य विकिपीडिया ऑनलाइन विश्वकोशांची फ्रेंच भाषेतील आवृत्ती आहे. विकिपीडियाच्या अधिकृत इंग्रजी संस्करणाच्या निर्मितीच्या दोन महिन्यांनंतर २३ मार्च २००१ रोजी ही आवृत्ती सुरू केली गेली. ४ एप्रिल २०२१ पर्यंत यात २३,१५,०६२ लेख होते, ज्यामुळे ही इंग्रजी, सेबुआनो, स्वीडिश आणि जर्मन विकिपीडिया नंतर ही पाचवी सगळ्यात मोठी आवृत्ती ठरली आहे, तसेच ही रोमान्स भाषासमूहातील सर्वात मोठी विकिपीडिया आवृत्ती आहे. याचा संपादनसंख्येनुसार तिसरा क्रमांक आहे आणि विकीपीडियातील लेखखोलीच्या बाबतीत ६व्या क्रमांकावर आहे. इंग्रजी विकिपीडिया आणि जर्मन विकिपीडिया नंतर ही १० लाख ज्ञानकोशीय लेखसंख्या ओलांडणारी तिसरी विकी आवृत्ती होती, आणि २३ सप्टेंबर २०१० रोजी ही घटना घडली. एप्रिल २०१६ मध्ये या प्रकल्पात ४,६५७ सक्रिय संपादक होते, ज्यांनी त्या महिन्यात कमीतकमी पाच संपादने केली.
२००८ मध्ये, फ्रेंच विश्वकोश क्विडने विकिपीडियाच्या फ्रेंच आवृत्तीसोबत स्पर्धेत मागे पडल्यामुळे कमी विक्रीचे कारण देऊन त्याची २००८ची आवृत्ती रद्द केली. एप्रिल २०२१ पर्यंत फ्रेंच विकिपीडियावर ४०,६०,००० वापरकर्ते, १५६ प्रशासक आणि ६३,९९५ संचिका होत्या.
२ डिसेंबर २०१४ रोजी, फ्रेंच-भाषिक विकिपीडिया ऑनलाईन ज्ञानकोश २०,२२,५०४ नोंदणीकृत वापरकर्त्यांसह प्रथमच जर्मन आवृत्तीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकाची आवृत्ती झाली होती. या पुढे फक्त इंग्रजी (२३,३००,४५६ वापरकर्ते) आणि स्पॅनिश (३४,०१,४९३ वापरकर्ते) या दोन भाषांच्या आवृत्त्या होत्या.
२०१३ च्या ऑक्सफोर्ड इंटरनेट इन्स्टिट्यूटच्या, ताहा यासरी आणि इतर संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, फ्रेंच विकिपीडियावरील सर्वात विवादास्पद लेख हे सागोलेन रॉयल (Ségolène Royal) आणि अज्ञात उडणारी वस्तू ([१]objet volant non identifié) होते.
फ्रेंच विकिपीडिया
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.