इंग्लिश विकिपीडिया (इंग्लिश : English Wikipedia), विकिपीडियाची इंग्लिश भाषेतील आवृत्ती आहे. १५ जानेवारी २००१ रोजी इंग्लिश विकिपीडियाची स्थापना झाली होती आणि सप्टेंबर २००६ पर्यंत त्यातील लेखांची संख्या २० लाखांवर पोचली होती. ही विकिपीडियाची पहिली आणि सर्वात मोठी आवृत्ती आहे. मार्च २००९ मध्ये विकिपीडियावरील एकूण लेखांपैकी इंग्लिश लेखांची टक्केवारी २२.३ होती, तर ऑक्टोबर २०१२ पर्यंत ती १७.४% झाली. इतर भाषांमध्ये विकिपीडियाच्या अस्तित्वामुळे, २००३ पासून इंग्लिश विकिपीडियाच्या सहभागाची टक्केवारी ५०% टक्क्यांवरून घसरत गेली आहे. १३ जानेवारी २०२१ रोजी इंग्लिश विकिपीडियाचे १ अब्ज (१०० कोटी) संपादन झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लिश विकिपीडिया
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.