फुरसे (शास्त्रीय नाव : Echis, उच्चार: एकिस; इंग्लिश: Saw-scaled viper) हा मध्य पूर्व आणि मध्य आशिया भारतीय उपखंडात सर्वत्र आढळणारा विषारी साप आहे. महाराष्ट्रात कोकणात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात हे साप फार आहेत. हा भारतातील चार सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. हा साप भारतातील सर्वाधिक सर्पदंशांना आणि मृत्यूंना कारणीभूत आहे. महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात त्याला "फरूड" असेही म्हणले जाते. २००९ साली इराक मध्ये त्तैग्रीस आणि युफ्रायटिस नद्यांच्या खोऱ्यांत दुष्काळ पडला होता, त्या वेळी तिकडच्या हजारो फुरशांनी इराकी जनतेमध्ये दहशत पसरवली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फुरसे
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.