नागराज किंवा किंग कोब्रा हा भारतातील पुर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे हा नावाप्रमाणेच नागराज आहे. विषारी सापांमध्ये लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात नागापेक्षा कमी परंतु मात्रा मोठी असल्याने फार धोकादायक. याचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. याचा फणा नागांपेक्षा छोटा असतो डिवचला गेला असता ३ ते ४ फूट उंच फणा उभारतो. घनदाट जंगले हा साप पसंत करतो व कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतो. अभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहे. सापांमध्ये अतिशय दुर्मिळ असे सहचरी जीवन जगतो ( काही काळापुरतेच) अंडी टाकण्यासाठी हा साप घरटे करतो. मार्च-एप्रिल दरम्यान मादी वाळलेला पाला-पाचोळा शेपटीच्या साह्याने गोळा करून त्यात १५ ते ३० अंडी घालते. अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली पिल्ले जवळपास १ ते २ फूट लांबीची तर पूर्ण वाढलेला नागराज सरासरी १० ते १५ फूट लांबीचा असतो. हा साप इतर सापांना खातो याचा रंग गडद हिरवट,राखाडी,पिवळट तपकिरी असून शरीरावर पिवळसर पांढरे आडवे पट्टे असतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नागराज
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.