फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार

थोडक्यात पण महत्त्वाचे.

फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार हा दरवर्षी फिल्मफेर नियतकालिकातर्फे बॉलीवूडमधील सर्वोत्तम दिग्दर्शकाला दिला जातो. हा फिल्मफेर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. पहिला फिल्मफेर पुरस्कार २१ मार्च १९५४ रोजी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये १९५३ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांचा सन्मान करण्यात आला आणि तेव्हापासून ह्या श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे. १९५८ पर्यंत, इतर कोणत्याही नामांकनाची घोषणा करण्यात आली नव्हती आणि फक्त विजेत्याला थेट पुरस्कार देण्यात येत होते.

या श्रेणीतील पहिले विजेते बिमल रॉय होते ज्यांना दो बिघा जमीन या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. रॉययांनी हा पुरस्कार सर्वधिक ७ वेळा जिंकला असून (७ नामांकनांमधून) यश चोप्रा यांना सर्वाधिक वेळा असे १२ नामांकन (४ पुरस्कार) मिळाले आहे. रॉय यांच्या खालोखाल संजय लीला भन्साळी (५), यश चोप्रा (४) आणि राज कपूर (४) ह्यांना पुरस्कार मिळाले आहे. महेश भट्ट यांना ६ नामांकन मिळून एकही पुरस्कार मिळाला नाही. एकाच वर्षात दोन नामांकन मिळवणारे असे ३ दिग्दर्शक आहेत: १९७४ मध्ये गुलजार (अचानक आणि कोशिश), १९७७ मध्ये बासू चॅटर्जी (छोटी सी बात आणि चितचोर) आणि १९८० मध्ये हृषिकेश मुखर्जी (गोल माल आणि जुर्मना); परंतु त्यांना या चित्रपटांसाठी पुरस्कार मिळाले नाहीत. २०२४ मध्ये १२वी फेल या चित्रपटासाठी विधू विनोद चोप्रा यांना नवीनतम पुरस्कार मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →