फिल्मफेर आर.डी. बर्मन पुरस्कार हा दरवर्षी फिल्मफेर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमध्ये नवीन संगीतकार, पार्श्वगायक/पार्श्वगायिका, गीतकार यांना दिला जातो. प्रसिद्ध भारतीय संगीत दिग्दर्शक आर.डी. बर्मन यांच्या नावाने दिला जाणारा हा फिल्मफेर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.
बर्मन यांचे ४ जानेवारी १९९४ रोजी वयाच्या ५४ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांचा शेवटाचा चित्रपट १९४२: अ लव्ह स्टोरी च्या प्रदर्शनाच्या काही दिवस आधीचे त्यांचे निधन झाले व ४० व्या फिल्मफेर पुरस्कार सोहळ्यात (१९९५) बर्मनयांना सर्वोत्तम संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. ह्याच सोहळ्यात १९९५ साली फिल्मफेरने आर.डी. बर्मन पुरस्कार देण्यास सुरुवात केली व पहिले विजेते ए.आर. रहमान होते ज्यांना रोजा चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळाला.
२०२४ पर्यंत हा पुरस्कार २६ व्यक्तिंना दिला गेला आहे, ज्यात १४ संगीत दिग्दर्शक, ११ गायक/गायिका आणि फक्त एक गीतकार (मेहबूब कोतवाल - रंगीला) आहे. २०१५, २०१८, २०२१ आणि २०२२ मध्ये ह्या पुरस्काराचे कोणीच मानकरी नव्हते.
फिल्मफेर आर.डी. बर्मन पुरस्कार
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?