प्रिया शरद बापट ( १८ सप्टेंबर १९८६) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. प्रिया प्रामुख्याने मराठी चित्रपटांत, नाटकांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. २००० सालच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून तिने अभिनयाची सुरुवात केली. मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई इत्यादी बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करणारी प्रिया नवा गडी.. नवं राज्य ह्या मराठी नाटकामध्ये आघाडीच्या भूमिकेत चमकली. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. २०“८ च्या डिसेंबरमध्ये प्रिया बापट हिने नाटक रंभूमीवर निर्माती म्हणून एक नवे पाऊल टाकले. 'दादा एक गुड न्यूझ आहे ' हे नाटक तिने प्रक्षकांसमोर आणले.
ती सिटी ऑफ ड्रीम्स(मायानगरी) या वेबसीरीजमध्येही काम करत आहे.त्यामधे तिला मुख्यमंत्री पौर्णिमा राव गायकवाड (आमदार,विधानपरिषद) ही भूमिका दिलेली आहे.
प्रिया बापट
थोडक्यात पण महत्त्वाचे.