तेजश्री प्रधान

या विषयातील रहस्ये उलगडा.

तेजश्री प्रधान

तेजश्री प्रधान (२ जून १९८८) ही एक अभिनेत्री आहे. तेजश्री प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये आणि मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. ती मूळची डोंबिवलीची असून तिने 'ह्या गोजिरवाण्या घरात' या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिची नंतरची मुख्य भूमिका 'लेक लाडकी ह्या घरची' मालिकेमध्ये होती. तसेच झी मराठी वरील 'होणार सून मी ह्या घरची' या सुपरहिट झालेल्या मालिकेमध्ये केलेल्या जान्हवीच्या भूमिकेमुळे तेजश्रीला अमाप लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील नायक श्रीची भूमिका करत असलेला शशांक केतकर याच्याशी तिने लग्न केले, पण वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर तिची झी मराठी वरील 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिकाही लोकप्रिय ठरली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →